search engine

Custom Search

प्रेम आई बाबा

खरे प्रेम आंधळे का असते ?
..
..
..
..
...
..
..
..
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म
होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते.. ♥♥♥

ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर ...मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय
करीन ते
घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात
पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत
असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर
जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले
आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!
आई बाप्प जिवंत असता नाहि केली तू सेवा...
मग
मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा...
.
बुँदि लाडूच्या पंगती बसवशी...
नंतर तू जेवाया...
..
काया जिझवूनी तूझ्या शिरावर
ठेविली सुखाची छाया...
..
अरेऽ वेड्या
मिळणार नाहि पुन्हा आई बाप्पाची माया...





मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात
हरवते..!!






आई कोणिच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज
कुशित घेऊन झोपणार



स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
-----तो एक बाप असतो.....




मुलगी म्हणजे मायेचा आगर
आहे,मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर
आहे,लहानपणी आई वडिलांचा सांभाळ
करणारी मुलगीच असते,आई बाबांच्या 
कामात मद्त करणारी मुलगीच असते,
भावाचं अतूट नातं जपणारी मुलगीच असते,
सासर आणि माहेर यांना प्रेमानं जोड्णारी
मुलगीच असते,आणि शेवट्च्या क्षणी बाबा....
...म्हणून आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा
मुलगीच असते.मुलगी वाचवा,देश वाचवा .




खिशातल्या
हजार रुपयांची किंमत
सुद्धा
लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या
एक रुपयापेक्षा
कमीच असते..







आई म्हणजे लई भारी !!
आई म्हणजे अगदी छान !!
आई म्हणजे निराळ हास्य !!
आई म्हणजे अनमोल प्रेमाचा खजिना !!
आई म्हणजे त्याग समर्पणाची मूर्ती !!
आई म्हणजे घरावरची सावली !!
आई म्हणजे दैवत !!
आई म्हणजे वात्सल्याचा झरा !!
आई म्हणजे आशिर्वादाचे भांडार !!
आई म्हणजे प्रकाशमय ज्योत !!
आई म्हणजे अनंत सुखाची सावली !!
आई म्हणजे लेकरांचा श्वास !!
आई म्हणजे विशाल हृदयाची मूर्ती !!
आई म्हणजे आनंदाची सरिता !!
आई म्हणजे संस्काराची देवी !!





No comments:

Post a Comment