search engine

Custom Search

Thursday, July 31, 2014

आठवण माझी ही येइल
मी गेल्यावर...!
रात्रि झोपे तून
दचकून मी जागा होतो,
अणि या अंधारात तुला
शोधायचा प्रयत्न मी करतो,
हताश होउन पुन्हा
झोपायचा प्रयत्न मी करतो,
तेवढ्यात एक अश्रु
डोळ्यातून गालावर ओघलतो,
सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
नाही रहात पुन्हा
झोपायचा ताल-मेळ,
असे का होते की आपण
ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,
त्या व्यक्तीने क्षणात
आपल्याला सोडून जावे,
आणि
स्वप्नाच्या दुनियेत
बांधलेले घर, खाडकन फुटावे,
कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर
समजुन घेत होतो,
तुझ्यावर येणार्या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो,
तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
माफ़ी मी मागत होतो,
तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने,
वेळोवेळी मीच रडत होतो,
तुझ्याकडून झालेली चुक
तुला कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या
अश्रुनाही किम्मत राहिली नाही,
कामाचा दबाव आहे
असे म्हणून, तू माला
टाळत होतीस,
पण या कारणा खाली,
तूच माझ्या पासून दुरावत
होतीस,काम तेव्हा मी ही
करत होतो,
माझ्या कामाचा दबाव
तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या
साथाची गरज आहे,
तुलाच मी समजुन घेणे
हेच माझ्या नशिबात आहे,
तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत
गेलेले अंतर, हे तर कधीच
मिटले नाही, दरोज झोपताना
देवाकडे एकचगार्हने असते,
तू सदैव खुश रहावी हेच
माझेमागणी असते, आशा
आहे तू पुन्हा माझ्याकडे
परतावी, पण तू येणार नाही
हे वास्तव स्वीकारता येत नाही,
प्रेम माझे संपणार नाही
मी मेल्यावर, पण आठवण
माझी ही येइल मी गेल्यावर...
आठवण माझी ही
येइल मी गेल्यावर...

No comments:

Post a Comment