search engine

Custom Search

Thursday, July 31, 2014

प्रेम म्हणजे kay

मला माझ्या मित्राने विचारले
कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल तरी
गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर
फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे
प्रेम...
दिवाळीला स्वतःसाठी कपडे न घेता मुला-
मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स
आणि कपडे
घेणारे बाबा म्हणजे प्रेम...
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी
आई- बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे
आजी-आजोबा म्हणजे प्रेम...
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास
का अशी
विचाणारी बहिण म्हणजे प्रेम...
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊ
भीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा
भाऊ म्हणजे प्रेम...
आणि या सर्वांची काळजी घेवून
स्वतःची काळजी
नकरता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा
बनवणारी बायको म्हणजे प्रेम

No comments:

Post a Comment